मागे जा

वांग्याचे थालीपीठ

साहित्य :

एक मोठे वांगे,
सत्वान्न स्पेशल थालीपीठ पीठ,
तिखट,
मीठ,
हिंग,
हळद,
थोडा काळा मसाला आणि कोथिंबीर.

कृती :

वांग्याला तेलाचा हात फिरवून घ्यावा व वांगे भाजून घ्यावे. नंतर ते एखाद्या पातेल्याखाली झाकून ठेवावे. नंतर साले कडून चमच्याच्या टोकाने गर काढावा. नंतर त्या मध्ये अंदाजे तिखट, मीठ, मसाला, हिंग, हळद व कोथिंबीर घालावी. नंतर त्यात मावेल तेवढे सत्वान्न स्पेशल थालीपीठ पीठ घालावे व मळावे. व तव्यावर या पिठाचे थालीपीठ लावावे. कडेने तेल सोडून चांगले लालसर करावे व गरम खायला द्यावे.