आमच्या विषयी
उत्कृष्ट दर्जाचा वसा घेतलेल्या श्रेयस कुलकर्णी फ्लोअर्स प्रा.ली. द्वारा सत्वान्न
पिठाचे उत्पादन, पॅकिंग व वितरण केले जाते.
परिवाराच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात सत्त्वपूर्ण अन्नाचा समावेश कटाक्षाने असायला
हवा, हा प्रत्येक गृहिणीचा आग्रह असतो. म्हणूनच १००% शुद्ध निर्वाळा देणारे पीठ तयार
करण्यापूर्वी जाणकारांकडून धान्याची कसून पारख करून, अद्ययावत यंत्रणेचा वापर करून
शुद्धता व स्वच्छता राखण्यासाठी काटेकोर दक्षता घेतली जाते. आणि योग्य वजन व चांगल्या
दर्जाचे पॅकिंग करूनच सत्वान्न ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येते.
त्यामुळे श्रेयस कुलकर्णी फ्लोअर्स प्रा.ली. कडून सातत्याने ग्राहकांना मिळतात पोषक
व चवदार आहारासाठी धान्यातील सत्ववंश टिकवलेली दर्जेदार पीठे...अगदी खऱ्या अर्थाने
सत्वान्न !
श्री श्रेयस कुलकर्णी
B. E. Computer
मॅनेजिंग डायरेक्टर
श्रेयस कुलकर्णी फलोअर्स प्रा. ली. चे संस्थपाक अध्यक्ष (मॅनेजिंग डायरेक्टर ) श्री.
श्रेयस कुलकर्णी हे पुणे स्थायिक उद्योजक असून मूळचे नाशिकचे आहेत. शिक्षणाने स्वतः
कॉम्पुटर इंजिनीर आहेत;त्यांनी पुण्यात प्रिंटिंग व्यवसायात गेल्या दशकात अमुलाग्र
क्रांती केली आहे. नाशिक शहारा प्रति असलेल्या प्रेम आणि ऋण भावनेतूनच सत्वान्न ची
सुरुवात नाशिक मधून झाली .
आपल्या कुटुंबाबरोबरच , समाजाची आणि राष्ट्राची सत्वपुर्ण अन्नाची गरज जाणून सत्वान्न
ची निर्मिती झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक सत्वपुर्णता ह्यांची सांगड घालून
सादर आहे सत्वान्न .