१ वाटी तांबड्या भोपळ्याच्या वाफवलेल्या फोडी, १ वाटी गुळ, १/४ चमचा मीठ, सत्वान्न स्पेशल उपवास भाजणीचे पीठ.
भोपळा, गुळ व मीठ एकत्र करून कालवावे. त्यात भिजेल इतके सत्वान्न स्पेशल उपवास भाजणीचे पीठ घालावे. भाकरीच्या पिठापेक्षा जरा सैल पीठ भिजवावे. नंतर तव्याला तुपाचा हात फिरवून त्यावर थालीपीठ लावावे. कडेने तूप सोडावे. मंद आचेवर दोन्हीकडून लालसर होईपर्यंत भाजावे.