कृती :
पीठ मोजून घ्या. लहान पातेलेभर पीठ असेल तर त्यापेक्षा थोडे कमी पाणी घेऊन उकळण्यास ठेवा. उकळी आली कि त्यात ताक, मिरच्या, मीठ, जिरेपूड घाला. नंतर सत्वान्न शिंगाड्याचे पीठ घालून ढवळा व उतरवून ठेवा. थोड्या वेळाने मळून चकल्या करा व गरमागरम खायला द्या. ह्या चकल्या अगदी आयत्या वेळी व थोड्याच करायच्या असल्याने प्रमाणाची जरुरी नाही.