अर्धी वाटी सत्वान्न कुळीथ पीठ,८-१० कढीपत्त्याची पाने,३-४ हिरव्या मिरच्या,अर्धा चमचा मीठ,कोथिंबीर,२ आमसुले,२ पळ्या तेल,फोडणीचे साहित्य.
तेलात मोहरी,जीरे, हिंग हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करावी. त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत. सत्वान्न कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली कि खाली उतरून त्यात कोथींबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.