३ वाट्या सत्वान्न ज्वारीचे पीठ, १ मोठा कांदा , ७-८ लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, मीठ, १ चमचा लोणी.
कांदा चिरून घ्या. लसूण व मिरच्या वाटून घ्या. नंतर सर्व एकत्र करून पीठ भिजवा व नेहमीप्रमाणे भाकरी करा.