दोन वाट्या सत्वान्न कणिक, दीड वाटी सत्वान्न बेसन (डांळीचे पीठ ), दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एका लिंबाचा रस, हिंग, मीठ, थोडी साखर, ३ टीस्पून ओले खोबरे, थोडे तिखट, तूप.
सत्वान्न कणिक, थोडे पीठ व तेल एकत्र करून नेहमीप्रमाणे पीठ भिजवा. बाकी इतर वस्तू एकत्र करून पीठ भिजवा. नंतर सत्वान्न कणकेच्या पारित सत्वान्न बेसनाचे सारण भरून उंडा तयार करा. पिठीवर पराठा लाटून घ्या. दोन्हीकडून शेका व कडेने तूप सोडून गरमागरम खायला द्या.