अर्धी वाटी सत्वान्न बेसन, दोन वाट्या सत्वान्न तांदुळाची पिठी, दोन काकड्या, एक मूठभर तीळ, अर्धी वाटी चिरलेला गुळ, चवीला तिखट, मीठ, एक चमचा जिरे, पाव वाटी तेल मोहनासाठी.
काकडी किसून घ्यावी. काकडीमध्ये थोडेसे मीठ घालून काकडी चांगली कुस्करावी. हाताने हलकेच दाबून थोडेसे पाणी बाजूला काढून ठेवावे. नंतर काकडीमध्ये गूळ , तिखट, मीठ, जिरे, तीळ वगैरे सर्व घालावे. गुळ विरघळून घ्यावं व सत्वान्न तांदुळाची पीठ घालावी. पाव वाटी तेलाचे मोहन घालावे व पीठ घट्टसर कालवावे. पीठ भिजवताना काकडीचे बाजूला काढून ठेवलेले पाणी घालावे. नंतर या पिठाचे बोराएवढे लहान लहान गोळे करून तेलामध्ये तळून काढावे.