मागे जा

बाजरी-खाकरा किंवा रोटी

साहित्य :

१ वाटी सत्वान्न बाजरीचे पीठ,
१ वाटी सत्वान्न कणिक,
तिखट,
मीठ,
धने-जिरे पूड,
थोडे तेल व ओव्याची पूड.

कृती :

सर्व साहित्य एकत्र करून सत्वान्न पीठ भिजवावे. नंतर पोळीप्रमाणे लाटून घ्यावे. तव्यावर शेकावे. कडेने तूप सोडावे. खाकरा हवा असेल तर सर्व पोळ्या करून घ्याव्या. सपाट तव्यावर सर्व पोळ्यांची थप्पी ठेवावी. अगदी थोडे तूप सोडून गोल गोल फिरवून लालसर करावे. लालसर झाल्यावर खालचा खाकरा काढून घ्यावा. असे सर्व करावे. फक्त सत्वान्न कणिक वापरूनही अशी रोटी व खाकरा करता येईल.